अखिल भारतीय मराठा महासंघ जळगांव जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित, विलास ताठे यांची रावेर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती

अनामित


[ads id='ads2]

 रावेर प्रतिनिधी( राजेंद्र अटकाळे) अखिल भारतीय मराठा महासंघ जळगांव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विद्यमान अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, माजी आमदार नरेंद्र अण्णा पाटील,कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख,चिटणीस प्रमोद जाधव,राष्ट्रीय युवक प्रतिनिधी अतीष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्ह्यातील कार्यकारिणी घोषित करण्यात आली.यावेळी जिल्हा अध्यक्ष पदी प्रा.मनोज पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

[ads id='ads1]

कार्यकारिणीत संपर्क प्रमुख पदी सुदर्शन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष चंदन पाटील, उपाध्यक्ष अतुल सोनवणे, उपाध्यक्ष राहुल पाटील, सरचिटणीस दिपक पाटील, जिल्हा संघटक गोपाल पाटील, युवक अध्यक्ष शुभम पवार, जिल्हा युवक कार्याध्यक्ष मंगेश पाटील, युवक उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, युवक सरचिटणीस पंजाब देशमुख, जळगांव महानगर अध्यक्ष जयेश पाटील, महानगर उपाध्यक्ष विजय बांदल, महानगर युवक अध्यक्ष प्रदीप पाटील,महानगर युवक उपाध्यक्ष पंकज पाटील व तसेच जिल्हा भरातील सर्व तालुकाध्यक्ष व तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आल्या.या कार्यक्रमात 


संघटने विषयीची माहिती,ध्येय,धोरणं,बैठकीचे उद्दीष्टे स्पष्ट करण्यात आली व संघटनेची पुढील वाटचाल या विषयीची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रा.मनोज पाटील यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी चे नियुक्ती बद्दल आभार मानलेत तसेच जिल्हा भरात मराठा महासंघाच्या गाव तेथे शाखा,युवकांचे संघटन व अनेक सामाजिक उपक्रम भविष्यात करण्याविषयी चर्चा केली.

या कार्यक्रमात जिल्हा बैठकीसाठी जिल्हा भरातील नवनियुक्त पदाधिकारी हजर होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!