काेंढाळी - येथे असलेल्या नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सातनवरी येथे खड्डा चुकविण्याच्या नांदात एका अनियंत्रित चारचाकी ने दुभाजक ताेडून रस्त्यालगत बसची वाटबघत असलेल्या पाच जणांना या कारने उडविले. यात चारहीजणांचा मृत्यू झाला आहे
[ads id=ads1]
यात एक महिला गंभीर जखमी झाली. मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावाचा समावेश आहे. तर हा अपघात रविवारी दुपारी घडला. या अपघातात बंडू सालवणकर (वय ५५), चिन्नू सोनबरसे (वय१३), शाैर्य डोंगरे (वय ९) व शिराली डोंगरे (वय६ ) अशी मृतांची व्यक्तींची नावे आहेत. ललिता सोनबरसे (वय ५०) या गंभीर झाल्या आहेत. तर हे सर्वजण सातनवरी बसस्टाॅपजवळ बसची प्रतीक्षा करीत उभे हाेते.
अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने बसस्टाॅपजवळील खड्डा चुकविण्याच्या नांदात थेट दुभाजकाला जाेरात धडक दिली असता कार दुभाजक ताेडून थेट प्रवाशांच्या अंगावर गेली आणि सर्व्हिस रस्त्यावर उलटली. यात पाचजण गंभीर जखमी झाले. चारजण दवाखन्यात नेताना दगावले.
