[ads id="ads2"]
Representative-(Jitendra Rathod) धुळे आज दि.२५/१०/२०२१ रोजी शिवशक्ती वाहतूक सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अलीभाई, उपाध्यक्ष अशपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यावर करवंद नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले वर्षानुवर्षे या रस्त्याची अवस्था खूप खराब आहे
[ads id="ads1"]
सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असून मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक आमदार ,खासदारांना देखील कुठलीच काळजी नसून ते आपल्या कार्यालयातच बसून खुर्च्या गरम करत आहेत या आधी देखील बांधकाम विभागाला निवेदन दिले होते पण त्यांच्याकडून कुठलेच पाऊल उचलले गेले नाहीत त्या पार्श्वभूमीवर रास्ता रोको करण्यात आला व याद्वारे बांधकाम विभागाला सक्त इशारा देण्यात आला आहे की जर आपण रस्त्याचे काम केले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना दिवसभर त्या खड्ड्यात उभं ठेऊन आंदोलन करण्यात येईल याची बांधकाम विभागाने नोंद घ्यावी. यावेळी शिवसेना उपजिल्हासंघटक विभाभाई जोगराणा,तालुकाप्रमुख दिपक चोरमले, शिवशक्ती वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू टेलर ,युवासेना उपजिल्हाअधिकारी अनिकेत बोरसे,शिवशक्ती वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष मसूद शेख, तालुकाध्यक्ष वाजीद मलक,युवासेना उपतालुकाधिकारी जितेंद्र राठोड,वाल्मिक कोळी, सुनील सूर्यवंशी, शहराध्यक्ष विजय पवार, गणेश बिरारी, उपशराध्यक्ष अशोक मिस्तरी,नंना जाधव,आबा मराठे, जावेद शेख, तन्वीर सय्यद, अरबाज शेख, शोएब मण्यार, गुड्डू मोमीन,सागर सुतार मुकेश मराठे,भीमसिंग कर्नल,किशोर माळी,प्रशांत इंदासे, चंदूभाऊ आदी शिवसैनिक उपस्थित होते.