[ads id="ads2"]
जव्हार - पालघरमधील जव्हार येथे वैद्यकीय सुविधांअभावी एका 35 वर्षीय गर्भवती आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
[ads id="ads1"]
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ढाबेरीच्या रेखा पोटिंडाला शनिवारी दुपारी प्रसूती वेदना झाल्या आणि तिला प्रथम साखरसेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला पतंगशाह वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा सल्ला दिला.
तेथून तिला सायंकाळी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र वाटेतच बाळाचा मृत्यू झाला आणि शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास महिलेचाही मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सलीमठ म्हणाले की, या घटनेमुळे त्यांना दुःख झाले आहे आणि ते जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा करतील.