रावेर प्रतिनिधी : नवरात्री उत्सवांमध्ये वीज पुरवठा सुरळीत द्यावा: धनजंय दादा युवामंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी यांच्या तर्फे रसलपुर महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले.
महावितरण अधिकारी शेख यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की उपरोक्त संदर्भिय विषयानव्ये आपणास विनंती की, दि.०७/१०/२०२१ पासून सुरू होत असणाऱ्या नवरात्री उत्सवांमध्ये वीज पुरवठा सुरळीत द्यावा व कोठे जर विज खंडीत झाली असेल तर ती तात्काळ सुरळीत करावी कारण नवरात्र उत्सव हा भावनेचा आणि श्रध्देचा आहे इथे कुठल्याही प्रकारची आपत्ती येऊ नये व भाविकांचे मन दुखावले जातील अशी कृती करू नये व आपणास हि सर्वांचे सहकार्य लाभेल हि ग्वाही आम्ही देतो.[ads id="ads2"]
अशा आशयाचे निवेदन रसलुर महावितरण अधिकारी शेख यांना दिले आहे. त्या नंतर शेख साहेबांनी आम्हांला शब्द दिला की आम्ही सर्व सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करू व आमचे सर्व सहकार्य आपल्या सोबत आहे. सदर निवेदनाच्या वेळी गौरव रा.महाजन (रावेर ता. सं. राष्ट्रवादी यु.काँग्रेस पार्टी), राष्ट्रवादी यु. स. अश्विन प्र. महाजन , विनायक वि.महाजन, दिपक रा. महाजन, मयुर रा.महाजन व धनंजय दादा युवामंच व राष्ट्रवादी युवकचे सदस्य उपस्थित होते.

