अंतुर्ली - येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात "धम्म परिवर्तन दिनानिमित्त" भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस सरपंच सौ सुलभाताई शिरतुरे व "माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. कलाम" यांचे जन्म दिना निमित्त त्यांचे प्रतिमेस वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए.भोईसर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
[ads id="ads1"]
याप्रसंगी पोलीस पाटील किशोर मेढे शेख भैय्या शेख करीम, बबलू मेढे, शरद महाजन ,नामदेव भोई, ग्राम ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, अनिल वाडीले, वसंत पंढरी पाटील,भानुदास टेलर, अनिल न्यावकर,शांताराम महाजन तसेच परिसरातील वाचक,प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
[ads id="ads2"] प्रेरणा वाचन दिनानिमित्त वाचनालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले तसेच त्यांचे जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन भरवून वाचन करण्यात आले.
वाचनालया तर्फे अध्यक्ष एस.ए.भोई सर यांनी दसरा निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.