[ads id="ads2"]
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) येथील श्री.व्ही. एस. नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत आज दि. ३१ आक्टोंबर रविवार रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .
[ads id="ads1"]
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम Google Meet या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
त्याकरीता *प्रा.मनोहर तायडे* यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.विद्यार्थीशी सवांद साधतांना प्रा.तायडे यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि देशाच्या राष्ट्रीय एकात्मता यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच त्यांना सरदार आणि लोहपुरुष का म्हटले जाते ती विषयी विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. या कार्यक्रमाला 70 विदयार्थी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थिती होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयार्थी विकास अधिकारी प्रा. संदीप धापसे यांनी केले तर आभार सह्ययक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सत्यशील धनले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ.जी.आर. ढेंबरे, डॉ.बी. जी.मुख्यदल, प्रा.उमेश पाटील,प्रा.नरेंद्र घुले, प्रा.चतुर गाढे, प्रा.संतोष गव्हाड, कार्यलयीन अधीक्षक श्री. युवराज बिरपन, एस. के. महाजन, सतीश वाघ यांनी परिश्रम घेतले.
