[ads id="ads2"]
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) माजी नगरसेवक तसेच कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीस यावल नगरपरिषदेने नोटीस दिली आहे. नोटीस मध्ये नमूद केल्या नुसार प्रत्यक्षात काय कारवाई होणार किंवा नाही याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून.
[ads id="ads1"]
यावल नगरपरिषदेने माजी नगरसेवक तसेच कायद्याचे माहितगार वकील अशोक प्रभाकर गडे व वगैरे यांना दिनांक 29/10/2021रोजी दिलेली नोटीस प्रत्यक्ष बघितली असता यावल नगरपरिषद गटनेता तथा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अतुल वसंतराव पाटील यांनी यावल नगरपरीषदकड़े तक्रार केल्यानुसार यावल नगरपरिषद अभियंता यांनी स्थळ निरीक्षण अहवाल सादर केला. तसेच ज्या अर्थी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम१७९सार्वजनिक रस्त्याच्या पृष्ठभागावरील प्रक्षेपणे,अथडळे व अतिक्रमणे अन्वये कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण किंवा अडथळा निर्माण केल्यास संबंधित नागरिक दंडास पात्र असेल,आणि ज्याअर्थी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ कलम ५२ अनधिकृत विकास करण्याबद्दल किंवा योजनेत नमुद केले असेल त्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे जमिनानीचा वापर करण्याबाबत शास्ती कलम ५३ अनधिकृत विकासाची कामे काढून टाकण्यास भाग पाडण्याची शक्ति, कलम ५४ अनधिकृत विकास थांबविण्याची शक्ती अन्वये जमिनीचा मंजुर आराखड्या व्यतिरिक्त अन्य प्रयोजनासाठी वापर करण्यास मनाई आहे.आणि ज्या अर्थी गट नं ४६ मधील मुख्य रस्ता हा अंकलेश्वर बु-हाणपुर महामार्गाला व मागील संपुर्ण गटांना जोडणा-या रस्त्यावर बेकायदेशीररित्या दुकानांचे बांधकाम केलेले आहे व रस्ता आपण पाईप बांधून अनाधिकृत रित्या बंद केलेला आहे.अशी तक्रार संदर्भिय तक्रारी अर्जान्वये इकडेस प्राप्त झालेली आहे.आणि ज्या अर्थी इकडील स्थळनिरिक्षणावरुन आपले विनापरावनगी दुकानांचे बांधकाम व उक्त नमूद रस्ता पाईप बांधून
अनाधिकृत रित्या बंद केल्याचे निदर्शनास येत आहे.
त्याअर्थी याद्वारे सूचित करणेत येते कि, सदरचे अनधिकृत केलेले अतिक्रमण आपण स्वखर्चाने काढून टाकावे.तसेच सदरचा रस्ता वापरासाठी मोकळा करुन द्यावा. आणि तसे न झालेस उक्त नमूद अधिनियमाप्रमाणे कारवाई करणेत येईल सदरचे अतिक्रमण नगरपरिषदेकडून काढून घेणेत येईल व त्याबाबतचा सपूर्ण खर्च आपणाकडून वसूल करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.
असे दिलेल्या नोटीस मधे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी म्हटले आहे. तरी कायद्याचे नॉलेज असलेले/माहितगार वकील तथा माजी नगरसेवक तथा अशोक प्रभाकर गडे वगैरे रा.वाणीगल्ली यावल यांच्या भूमिकेकडे तसेच नगरपालिका काय कारवाई करणार?याकडे संपूर्ण यावल शहरातील राजकारणाचे नागरिकांचे लक्ष वेधून आहे.