महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणा कडुन व न.पा. रावेर कडून पुरविल्या जाणा-या सेवा संदर्भात जनजागृतीपर शिबीर

अनामित
रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) विधी सेवा प्राधिकरण, मा. सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार, मा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मा. उच्च न्यायालय, मुबई आदेशान्वय तालुका विधी सेवा समिती रावेर व तालुका वकील संघ, रावेर यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि.08 ऑक्टोंबर 2021 लिगल अवेअरनेस व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडुन Rights of Women, ADR Mechanism, Under Trial Prisners यांना पुरविल्या जाण-या विविध पुरविल्या जाणा-या सेवांसंदर्भात नगरपालीका, रावेर येथे जनजागृतीपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.[ads id="ads1"]
 सदर शिबीरात सामान्य जनतेला पॉम्प्लेट्स वाट्न लिगल अवेअरनेस व वरिल प्रमाणे महाराष्ट्र राज्य विधा सेवा प्राधिकरणाकडून पुरविल्या जाणा-या सेवांची माहिती देण्यात आली. या प्रसंगी ॲड. विद्या सोनार मॅडम यांनी महिलांचे कायदे व त्याचे हक्क या विषयावर आपले विचार मांडले. त्यात त्यानी वडिलांचे संपतीत समान अधीकार कायदा 2005 घरगुती हिंसाचारा पासुन महिलाचे संरक्षण आणी खावटी बाबत मार्गदर्श केले.त्या नंतर एस एस मणीयार लॉ कॉलेजचे विद्यार्थी दिपक तायडे यांनी पर्यायी तंटानिवारण अर्थात ए डी आर या विषयावर मार्गदर्शन केले.
 त्या नंतर ॲड. अमिता जळगांवकर यांनी अंडर ट्रायल प्रिझनल यांचे हक्क आणी अधीकार या विषयावर सविस्तर मांडणी केली. या नंतर गायत्री धरराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट पर्यावरणा संबधी वैभव नेहेते याच्या व्दारा शपथ घेऊन करण्यात आला.[ads id="ads2"]
आयोजित शिबीरासाठी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी लोकपाल महाजन, दिपीका मोहन पाटील,ॲड. प्रतिभा राणे, पॅरा लिगल वॉलेंटीयर्स श्री राजेंद्र अटकाळे ,दयाराम मानकरे गुरुजी, बी.यु. पाटील, सौ. सुनिता डेरेकर, सौ.वर्षा पाटील नगरपालिका कार्यालय अधीक्षक एस.के तडवी, सहाय्यक कार्यालय अधीक्षक काळे, प्रभारी स्वच्छता निरिक्षक युवराज गोयर, सुभाष महाजन, पांडुरंग महाजन, वैभव नेहेते, व न.पा. कर्मचारी त्या नंतर दर्पण, आशाबाई, ओम साईराम, शीव सखी महिला बचत गट, आदी बचत गटाच्या महिला उपस्थीत होत्या. 
          
 तसेच न्यायालयीन कर्मचारी वरीष्ठ लिपीक श्री.व्ही. डी. मोरे, भुषण महाजन क. लिपीक, अतिश काळे क. लिपीक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!