दिल्ली वार्ताहर (सुशिल कुवर) सध्या देशातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, असे असतानाच लहान मुलांच्या कोव्हिडं प्रतिबंधात्मक लसीकरणा संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
[ads id="ads1"] देशातील २ ते १८ या वयोगटातील लहान मुलांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या करोना प्रतिबंधात्मक लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ही भारतीय बनावटीची लस असून भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. करोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये Covaxin जवळजवळ ७८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
प्रोढ नागरिकांप्रमाणेच २ ते १८ वयोगटातील मुलांना सरकारी दवाखान्यात ही लस मोफत दिली जाणार आहे. या लसी संदर्भात केंद्र सरकार लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे.
दरम्यान, संभाव्य करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्याचे बोलले जात होते, अशातच कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी मिळाल्याने ही दिलासादायक बाब ठरली आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सणांच्या काळात लोकांना कोविडच्या बाबतीत विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमच्याकडे तीन महिन्यांचे (सणासुदीचे) आव्हान आहे. सण साजरे करा पण जागरूक रहा. यासह, कोविडला अनुसरून योग्य ती काळजी घ्यावी. आम्ही यासंदर्भातील माहिती केंद्र सरकारमार्फतही जारी केले आहे.
