रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) रावेर पंचायत समितीत ग्राम पंचायत सदस्यांकडून कामाच्या मोबदल्यात पैसे मागत असेल तर पुरावे देवून तक्रारी करावी असे आवाहन गटविकास अधिकारी (Raver,BDO) दिपाली कोतवाल यांनी केले आहे.[ads id="ads2"]
याबाबत माहिती अशी की, Raver तालुक्यातील ऐनपूर(Ainpur) ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल जैतकर यांनी पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कामाच्या मोबदल्यात पैसे मागितल्याची लेखी तक्रार आमदार चंद्रकांत पाटलांकडे केली होती. यामुळे हे प्रकरण बाहेर आले होते. यासंदर्भात Raver पंचायत समितीत कोणी कामाच्या मोबदल्यात पैसे मागत असेल तर पुरावे आणि तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती गट विकास अधिकारी(BDO,Raver) दिपाली कोतवाल यांनी दिली आहे.

