"मौलाना अबुल कलाम आजाद आदर्श सन्मान” पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

    रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय कर्जोद तालुका रावेर या संस्थे तर्फे शैक्षणिक, साहित्यिक ,सामाजिक व विविध क्षेत्रातील मौलाना अबुल कलाम आजाद राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त बंधू- भगिनीसाठी ” मौलाना अबुल कलाम आजाद आदर्श सन्मान”  पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे . 

  या पुरस्काराचे हे 10 वे  वर्ष आहे.हा दशक पूर्ती कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे . या पुरस्कारासाठी शिक्षक व विविध क्षेत्रातील बंधू- भगिनींना आवाहन करण्यात येते की आपल्या शैक्षणिक , साहित्यिक व सामाजिक कार्याचा प्रस्ताव दिनांक : २५  आॕक्टोबर २०२१ पर्यत पाठवायचा आहे .[ads id="ads2"] 

   तरी शिक्षक, साहित्यिक,कवी,पोलीस कर्मचारि आदि बंधू-भगिनींनी सदर कार्याचा प्रस्ताव पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे . त्यात शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक,  कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही या संस्थेचेची भूमिका आहे. याच अनुषंगाने

बंधू-भगिनींकडून प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, शाल ,पेन आदी राहील . रावेर यावल तालुक्याचे आमदार व जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे .

सदर प्रस्ताव एका प्रतीत व दोन रंगीत छायाचिञासह पाठवावे .

पता:--मौलाना अबुल कलम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रँथालय कर्जोद ता रावेर जि जळगाव


अधिक माहितीसाठी 

अध्यक्ष शकील अब्दुल शेख मो.नं.9823336417, 

आशिष पाठक मो.नं. 8668824672

हाजी सरफराज शेख मो. नं.

8668970644

उस्मान पटेल सर धरणगाव मो.नं 

 8390621411

यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!