मोरगाव प्रतिनिधी (धिरज तायडे)
दि.३०/०९/२०२१ रोजी रावेर तालुक्यातील मोरगाव येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. [ads id="ads1"]
त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की निळे निशाण सामाजिक संघटना राजकारणा पासून अलिप्त होऊन सामाजिक कार्याचा संकल्प केलेला आहे.[ads id="ads2"]
तसेच समाजातिल तरुणांनी राजकारणा पेक्षा समाजच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करावे . त्या प्रसंगी नियोजन समिती प्रमुख महेशजी तायडे , उपाध्यक्ष सदाशिव निकम , तालुका प्रमुख चंद्रकांत गाढे , उपाध्यक्ष सुधिर सैंगमिरे , नारायण सवर्णे , सचिव बाळु तायडे , बाळु निकम , युवक उपाध्यक्ष विजय धनगर , छगन सवर्णे , अरविंद भालेराव , दादाराव सवर्णे , प्रल्हाद हिवरे , धीरज तायडे , प्रवीण वाघ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

