चिनावल प्रतिनिधी : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 ( ज -1 ) नुसार विवाद निकालाचे सुचनापत्र प्रकरणी दिनांक 30/09/2021 रोजी खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात आला असून Chinawal ग्रामपंचायत सदस्य तब्बुसुमबी शे. अजमल यांना तीन अपत्य असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना पदावर राहण्यास अपात्र करण्यात आल्याचे निकालात म्हटले आहे.[ads id="ads2"]
विवाद अर्जदार परेश मुकुंदा महाजन यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे. व तब्बुसुमबी शे. अजमल यांना दिनांक 12/09/2001 नंतर 3 अपत्ये झाले असल्याचे सिध्द होत असल्याने सामनेवाले तब्बुसुमबी शे .अजमल यांना आदेशाच्या दिनांकापासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 ( ज -1 ) नुसार चिनावल, ता.रावेर ,जि.जळगाव या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून पुढे चालु राहण्यास अपात्र घोषित करणेत येत आहे. असे शुभांगी भारदे उपजिल्हाधिकारी यांचे सही निशी कळवण्यात आले आहे.[ads id="ads1"]
खर्चाबाबत आदेश नाहीत. सदरचा निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यांत यावा असे शुभांगी भारदे उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव यांचे पत्र प्राप्त झाले आहे.