नोएडा (यूपी) नोएडा पोलीस स्टेशन सेक्टर 39 परिसरातील सेक्टर 45 मध्ये एका तरुणीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिस उपायुक्त (महिला सुरक्षा) वृंदा शुक्ला यांनी सांगितले की, मुलीच्या आईने याप्रकरणी सेक्टर 39 पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
[ads id="ads2"]
फिर्यादीनुसार, सेक्टर 45 मध्ये राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीची छोटू नावाच्या तरुणासोबत बऱ्याच दिवसांपासून मैत्री होती आणि काल रात्री छोटूने मुलीच्या घरी येऊन तिला बोलण्याच्या बहाण्याने घराबाहेर काढले.
[ads id="ads1"]
तक्रारीनुसार छोटूने मुलीला मंदिराच्या मागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याच्या दोन मित्रांनीही मुलीसोबत गैरवर्तन केले.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात असून पोलिस सर्व पैलूंचा बारकाईने तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.