रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) तालुक्यातील कर्जोद येथे राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व पुरुष यांना दशकपूर्ती आदर्श पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम दि 14 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी व उद्घाटक जि.प.अध्यक्षा रंजनाताई प्रल्हाद पाटील ह्या राहणार आहेत.
[ads id="ads2"]
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अ.करीम सालार,एजाज अ.गफ्फार मलिक,दारा मोहम्मद,माजीद जकेरिया धनंजय चौधरी,हाजी अनिस हे असणार आहे. या कार्यक्रमामध्ये पुरस्कार्थी म्हणून डॉ पाकिजा पटेल( धरणगाव), उद्धव महाजन (भडगाव), शकील अहेमद (यावल), अ.सईद पटेल (जळगाव), विश्वास पाटील (एरंडोल), दत्तात्रय पाटील (भडगाव), जाहिरुद्दिन शेख (एरंडोल), शांताराम पाटील (पारोळा), रइसोद्दिन शेख (रावेर),दिलीप वैद्य (रावेर), योगिता वानखेडे (विवरा), आसिफ खान (जळगाव),
[ads id="ads1"]
योजना पाटील (अमळनेर), गोसावी भगवान (चाळीसगाव), क्षमा साळी (खडकेसिम), श्रीमती शालिनी सोमकुवर (वढोदा), रोपली सोनावणे (दुसखेडे), श्रीमती शितल पगार(नाशिक),अरुण महाले (नांदेड) रवींद्र पाटील(अमळनेर), श्रीमती पुष्पा राजपूत (चहार्डी), श्रीमती कविता पाटील ( विचवे, बोदवड), अश्विनी कोळी (फैजपूर), मोहसीन खान (धरणगाव), विकास जाधव (मंगरूळ), श्रीमती सुजाता सुरवाडे (शेंदुर्णी), शरीफ बागवान(मुक्ताईनगर), संतोष पाटील (रावेर) , सुषमाताई पाटील (दहीगाव),शेख भिकन शिकलघर (मुक्ताईनगर), मुदस्सर नजर (फैजपूर),सलीम खान (खिरवड), साबीर खान (जामनेर), निलेश लोहार(रावेर पो.स्टे.),योगेश पाटील (मुंजलवाडी), गुणवंत सातव(वाघोड),शेख इरफान (चिनावल), निलेश पाटील (बेलखेडे), संजय चौधरी (कोथळी), सौ वर्ष पाटील (केऱ्हाळे), रईस खान (यावल) हे असणार आहे.सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान मौलाना अबुल कलाम सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शेख शकील यांनी केले आहे.