[ads id="ads2"]
यावल वार्ताहर ( सुरेश पाटील) यावल शहरातील वार्ड क्रमांक चार मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वार्डातील नागरिकांना दूषित पाणी पिल्याने इतर आजार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वार्डातील नागरिकांसह शिवसेना शहर प्रमुख,उपप्रमुख यांनी यावल नगरपरिषद अध्यक्ष सौ.नोंशाद तडवी यांना लेखी निवेदन दिले.
[ads id="ads1"]
सोमवार दि.1नोव्हेंबर 2021रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल शहरात वार्ड क्र.4 मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वार्डातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने इतर आजार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,
त्यामुळे वार्ड क्र.4मधील पाईप लाईन बदलवून शुद्ध पाणीपुरवठा करणेबाबत कार्यवाही करावी कारण दूषित पाणी सेवन केल्याने कोणतेही दुष्परिणाम तसेच साथीचे रोग उद्भवल्यास त्याला नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. दिलेल्या निवेदनावर यावल शहर शिवसेना प्रमुख तसेच माजी नगरसेवक जगदीश कवडीवाले, शहर उपप्रमुख मोसिन खान अब्दुल वहाब खान,प्रभागातील आसिफ खान समशेर खान, इरफान खान अयुब खान,रहीम शेख अलीम शेख,शेख असिफ शेख इमाम,गुलाम रसूल शेख कासम,हसन खान जाकीर शेख, सुपडु खान कासम खान, यांनी आपली स्वाक्षरी केली आहे.तरी यावल नगरपालिका वार्ड क्र.4 मध्ये जो दूषित पाणीपुरवठा होत आहे त्याबाबत काय कारवाई करणार याकडे आता प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधून आहे.