[ads id="ads2"]
चलो जळगांव, चलो चलो जळगांव...च्या घोषणा
जळगांव - जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अतिवृष्टी व वादळामुळे आधीच प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे राज्यासह जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज भारतीय जनता पार्टी, जळगांव तर्फे माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात शिवतिर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यलय, जळगांव पर्यंत "शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा" काढून राज्यातील मविआ सरकारला इशारा देण्यात आला.
[ads id="ads1"]
जळगांव जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अतिवृष्टी व वादळामुळे आधीच प्रचंड अडचणीत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असुन राज्यातील मविआ सरकारने अजूनही कोणतीही नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही.
तसेच ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची वीज तोडणी, जबरजस्ती ककेली जाणारी वीज बिल वसुली, राज्य सरकारने वारंवार आश्वासने देऊन सुद्धा नकेलेली नुकसान भरपाई ई. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे राज्यातील निद्रिस्थ व निष्क्रिय मविआ सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी भाजपा तर्फे सदर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत असल्याबाबतचे यावेळी सांगितले.
सदर मोर्चा शिवतिर्थ मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालुन सुरु होऊन जिल्हाधिकारी कार्यलय, जळगांव पर्यंत काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्च्याचे मोठ्या सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी जिल्ह्यातील पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी आपापल्या मनोगतातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवत शब्दांचा प्रहार केला. राज्यातील मविआ सरकारला शेतकर्यांच्या समस्येशी काही एक देणे-घेणे नसल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला.
यावेळी सदर शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चास माझ्यासह माजी मंत्री आ.गिरीषभाऊ महाजन, बेटी बचाव बेटी पढाव राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री. अशोक कांडेलकर, खासदार श्री.उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा), भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जि.प.अध्यक्षा सौ.रंजनाताई पाटील, जि.प.उपाध्यक्ष श्री.लालचंद पाटील, आमदार श्री.संजय सावकारे, आमदार श्री.मंगेश चव्हाण, आमदार श्री.चंदुलाल पटेल, माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्यासह जिल्हातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी हजारोंच्या संखेने उपस्थित होते.