[ads id="ads2"]
अंतुर्ली - शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मुक्ताईनगर मतदार संघाचे सन्माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना शेतकर्यांच्या वतीने निवेदन एस. ए. भोईसर, अनिल वाडीले, शेख भैय्या शेख करीम, दिनेश पाटील, नामदेव भोई, व्हीं.आर.महाजन, शरद महाजन, किरण धायले व परिसरातील शेतकरी बांधव यांनी दिले.
[ads id="ads1"]
मागील वर्षी तीन किलोमीटर रस्ता खडीकरण होऊन डांबरी झाला पण पायवीहिर पासून शिव पर्यंत 700 मीटर रस्ता झाला नाही रस्त्याचे त्वरित खडीकरण व डांबरीकरण व्हावे अशी मागणी केली असता आमदारांनी लवकरच कामास सुरुवात होईल असे आश्वासन दिले शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला तसेच मागील वर्षी झालेल्या रस्त्याचे झाडे झुडपे तोडण्यात यावी, रस्त्याची डागडुजी करण्यात यावी ,साईट पट्ट्या दुरुस्त करण्यात यावा अशा विविध मागण्या आमदारांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या. या मार्गाने मुक्ताईनगर जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर चा फेरा वाचतो तरी काम त्वरित व्हावे अशी विनंती केली. प्रसंगी स्मशानभूमीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाठवून सर्वे केला व पुढील कामास गती यावी अशी विनंती केली व आभार मानले