रावेर येथे बळीराजा जयंती उत्सव उत्साहात साजरा

अनामित
[ads id="ads2"]
रावेर प्रतिनिधी :( राजेश रायमळे) येथे बळीप्रतिपदे निमित्त बळीराजा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की,रावेर येथील कृषिऊत्पन्न बाजार समितीत बळी प्रतिपदेनिमित्त लोककल्याणकारी, न्यायी,बहुजन ऊध्दारक,शेतकरी राजा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्व प्रथम बाजार समिती मध्ये सोपान बाबुराव पाटील यांच्या हस्ते पशुधन पूजन करून शेतकरी सत्कार व सन्मान करण्यात आला. 
[ads id="ads1"]
यावेळी सोपान पाटील, संजय चौधरी,प्रशांत बोरकर, ज्ञानेश्वर महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले.आपले मनोगत व्यक्त करतांना शेतकरी नेते राष्ट्रवादी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील म्हणालेत की,बळीराजा हा प्राचीन भारतातील एक अत्यंत सद्‌गुणी, प्रजाहितदक्ष व सामर्थ्यशाली असा राजा होता. बळी- हिरण्यकश्यपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व. हजारो वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता हाता.
 बळीराजाच्या पूर्वजांनी केलेल्या उत्तम शेतीमुळे पिकलेल्या धान्याने सिंधुसंस्कृतीमधील धान्याची कोठारे भरलेली होती. बळीराजानेही आपल्या पूर्वजांचे अनुसरण करीत, पण त्यांच्यापेक्षा अधिक कौशल्याने पेरणी सुरू केली. पेरणी धान्याची होती. पेरणी संस्कृतीचीही होती. पेरणी जीवनमुल्यांची होती, पेरणी जगण्याच्या कलेची होती. पेरणी रक्तमांसाची होती आणि माणसासाठी नव्या नव्या स्वप्नांचीही होती बळीराजा हा एक कर्तृत्ववान आदर्श राजा होता. ज्यांने आपले राज्य प्रजेच्या हिता-सुखासाठी समर्पित केले होते. आपल्या राज्यातील प्रजेचा विकास आणि संरक्षणांकडे त्यांने अधिक लक्ष दिले. हे करीत असताना त्याने कोणताही वर्ण, धर्म वा पंथ पाहीला नाही. न्याय करताना कधीही भेदभाव केला नाही. म्हणूनच बळीराजा हा उदारमतवादी, मोठ्या मनाचा, शुर, पराक्रमी, , बलवान, राजा होता.

बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता. शेतकर्यांना शेती विषयक सर्व ज्ञान असल्यामुळेच त्यांची शेती सम्रुद्ध होती. प्रजा सुखी,समाधानी व कर्तबगार होती. शोषण विरहीत समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट्य होते. स्त्री-पुरुष आपापल्या कुवतीनुसार आणि कौशल्यानुसार राज्याच्या सर्वच वैभवात भर टाकत असत.

 खैबर खिंडीतून घोडे दामटत आलेल्या आक्रमक आर्यांच्या सेनापतींनी बळीच्या देशाला लुबाडले. दशावतारातील वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही भाकडकथा आपणास पुराणातून सांगितली जाते मत्र त्यामागची सत्यता अशी आहे की,आर्य सेनापती वामन हा आपल्या टोळ्या घेवून बळीराज्याच्या प्रदेशात घुसला आणि त्याने लुटमार सुरू केली. साम, दाम, दंड, भेद नितिचा वापर करून बळीराजाला छलकपट करून बंदी बनविले. त्याची शस्त्रे, संपत्ती व राजसत्ता हिरावून घेण्यात आली. भारता बाहेरून आलेल्या आर्यानी कपटाने बळीराजाला ठार मारले व बळीचे राज्य बळकावले.

    तरी आजच्या या बळी ऊत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी बळी राजाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्याचा संकल्प केला पाहीजे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र पाटील, गोंडू महाजन, कॉग्रेस तालुका अधक्ष ज्ञानेश्वर महाजन, हरीश शेठ गनवानी, जि.प.सदस्य 


आत्माराम कोळी, निलकंठ चौधरी श को फ.तालुका अध्यक्ष. सूर्यभान चौधरी, शिवाजी पाटील सर ,भरत कुँवर, मंजूर टेलर, रामदास लहासे, महेंद्र पवार, प्रशांत बोरकर ,मंदार पाटील, चांदखाॅ तडवी, शेख हसन, संतोष पाटील, समद शेख,योगेश पाटील, संजय चौधरी, महेश तायडे, मदनशेठ लोहार, भुषम चौधरी, सुरदास सर, दिपक भालेराव, भुपेंद्र जाधव, अमजद तडवी, शरीफ तडवी, भागवत चौधरी,तसेच शेतकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी नेते नेते श्री सोपानदादापाटील, मुंजलवाडी सरपंच योगेश पाटील, अखिल भारतीय ओबीसी महासभा जिल्हाध्यक्ष संजय चौधरी यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले तर मान्यवरांचे सत्कार योगेश पाटील यांना केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!