जळगाव {सुवर्णदिप वृत्तसेवा} शहरात आता पावसाळ्यानंतर विविध रस्त्यांच्या कामांना सुरूवात झालेली आहे. त्या अनुषंगाने महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी बुधवार, दि. 24 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभाग क्र. 8 मध्ये भेट देऊन रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी खोटेनगर, आनंद कॉलनी या भागांतील रस्त्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली.
[ads id="ads2"]
तसेच या रस्त्यांच्या कामांत गुणवत्ता जोपासली गेली आहे किंवा नाही हेही जाणून घेतले. त्यानंतर संबंधितांना रस्त्यांच्या कामातील गुणवत्तेत चुका झाल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही याप्रसंगी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी दिला.
