धक्कादायक - फैजपूर येथे गॅस कटरच्या सहाय्याने ATM मशीन तोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न

अनामित
फैजपूर - चोरी करणे घरे फोडणे हे तर तुम्ही ऐकलेच असेल मात्र आता जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाणारे यावल तालुक्यात फैजपूर शहरात चक्क ATM फोडण्याचा प्रयत्न झाला आहे वाचा मग सविस्तर प्रकरण तर फैजपूर येथे गॅस कटरच्या सहाय्याने ATM मशीन तोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न फसला तर ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
[ads id="ads2"] फैजपूर येथील दूध शीतकरण केंद्राच्या समोर STATE BANK च्या एटीएम मधुन. पहाटे धूर निघत असल्याचे काही जणांना दिसून आले. यामुळे नागरिकांनी स्टेट बँकेतील कर्मचार्‍यांना फोन लाऊन याबाबतची माहिती देण्यात आली. कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून पोलीस स्थानक आणि अग्नमीशामन दलास पाचारण केले. 
[ads id="ads1"] स्टेट बँकेच्या एटीएमला गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. मात्र चोरट्यांना मशिन कापता न आल्याने अर्धवट सोडून त्यांनी पळ काढल्याचे दिसून आले. ही घटना पहाटे झाल्याची माहिती समोर आली आहे. आज चौथा शनिवार आणि उद्या रविवार असल्याने बँकेतर्फे काल सायंकाळी एटीएममध्ये रोख रक्कम टाकण्यात आली होती.
  हीच रक्कम घेऊन पोबारा करण्याचा चोरट्यांचा मनसुबा होता. मात्र यात त्यांना अपयश आल्याचे दिसून आले. फैजपूर स्थानकाचे एपीआय आखेगावकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संदर्भात चौकशी सुरू केली होती. तर अग्नमीशामन दलाने धगधगत असलेली आग काबूत आणली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!