मुक्ताईनगर प्रतिनिधी : भारतीय राज्य घटना ही प्रत्येक भारतीय माणसाच्या हक्क आणि अधिकाराचे संरक्षण करीत असल्याने ती मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे त्यामुळे राज्यघटना हा आपला राष्ट्रग्रंथ आहे, असे प्रतिपादन मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील यांनी संविधान गौरव दिनी मुकाईनगर येथील आयोजित कार्यक्रमात केले.[ads id="ads2"]
या वेळी आ.चंद्रकांत पाटील यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून आपल्या मुकाईनगर विधान सभा मतदार संघातील १०० गावांमधील १०० नागरिकांना राज्यघटनेच्या १०० प्रतींचे वाटप करून राज्यघटनेला आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन केले. एखाद्या विधानसभेच्या सदस्याने आपल्या मतदारसंघातील १०० गावामधील १०० नागरीकांना १०० प्रतीचे वाटप करणे, ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याने आ.चंद्रकांत पाटील यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रमेश शेवाळे यांनी केले. तर उद्देशिकेचे वाचन दीपध्वज कोसोदे यांनी केले,त्यांच्या मागोमाग उपस्थितांनीही उद्देशीका म्हणून राज्य घटनेप्रती आदर व्यक्त केला. संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम मुकाईनगर येथील संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालयातील ज्ञानेश्वर सभागृहात पार पडला. विचारमंचावर आ. चंद्रकांत पाटील यांचे समवेत छोटुभाऊ भोई,अफसर खान, प्राचार्य आय डी पाटील,प्रा एल बी गायकवाड, छोटू पाटील उपस्थित होते, तर कर्यक्रमास मुक्ताईनगर नगरपंचायतीचे नगरसेवक मुकेश चंद्र वानखेडे, निलेश शिरसाठसह इतर नगरसेवक हजर होते,या कर्यक्रमास मुकाईनगर मतदारसंघातील रावेर, अंतुर्ली, कुऱ्हा काकोडा, बोदवड या भागातून नागरिकांनी गर्दी केली होती, आ. चंद्रकांत पाटील यांनी दिलेली राज्य घटनेची प्रत घेऊन जातांना सर्वांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्यासारखे होते, कार्यक्रमासाठी निरंजन तायडे, पंकज पांडव, मोहन बेलदार,भगवान महाले यांनी विशेष परिश्रम घेतले.

