जळगाव प्रतिनिधी (सुरेश पाटील) भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्याजवळ अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या MH 19 Y 7773 क्रमांकाच्या डंपरने आज एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एक महिला जागीच ठार झाली असून एक जण जखमी झालेला आहे.
[ads id="ads2"] सूत्रांच्या माहिती नुसार महिला ही कंडारी ता. भुसावळ येथील असून तिचे नाव प्रेरणा तायडे असल्याची माहिती आहे. तर, या अपघातामुळे अवैध वाळू वाहतुकीवर बंदी कधी येणार प्रशासन यंत्रणा आतातरी जागे होणार की नाही हा प्रश्न विचारला जात आहे. [ads id="ads1"] अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या अपघातामुळे अवैध वाळू आणि गौणखनिज वाहतुक बंद करा त्यांना वेग मर्यादेचे भान राहिले नाही
Video येथे क्लिक करुन बघा 👇🏻