शिवक्रांती शिवसाहीत्य प्रसार अभियान क्रांती रथाला पोलीस निरीक्षक कैलासजी नागरे पोलीस स्टेशन रावेर यांनी दिली सदिच्छा भेट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

   


रावेर तालुका प्रतिनिधि (राजेश  रायमळे)

      रावेर शहरात रावेर पीपल्स बॅक जवळ दि . २३ ते २५ नोव्हेंबर पर्यंत प्रसारासाठी आलेल्या शिवक्रांती रथाला आज दि.२४/नोव्हेंबर २०२१ बुधवार रोजी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलासजी नांगरे साहेब यांनी दिली सदिच्छा भेट.[ads id="ads2"]  

     याबाबत सविस्तर वृत्त असे की,रावेर शहरात प्रथमच रावेर येथील पीपल्स बँकेसमोर दि.२३ ते २५ पर्यंत 

 वेळ सकाळी१० ते रात्री ०८ शिवक्रांती शिव साहित्य प्रसार अभियान क्रांती रथ आलेला असून सदर क्रांती रथाला रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलासजी नागरे साहेब यांनी पोलीस ठाण्याच्या काही कर्मचार्यांसह सदिच्छा भेट दिली.[ads id="ads1"]  

   सदर क्रांती रथामध्ये  ऐतिहासिक व बुद्ध, फुले,आंबेडकर आणि शिव इतिहास कालीन अभ्यासपूर्ण अशी ग्रंथ पुस्तके,पॉलिमार्बल मधील आकर्षक आणि उत्तम अश्या आकर्षक बुद्ध, शिवमूर्ती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मुर्ती असे बरेच शिव फुले आंबेडकरी साहित्य डोळ्यांचे पारणे फेडणारे साहीत्य आहे तरी सर्व शिवप्रेमी तसेच विविध अभ्यासक साहीत्य ग्रंथ पुस्तके खरेदी करून संधीचा लाभ घेत आहेत.पोलीस निरीक्षक कैलासजी नागरे यांनी सुध्दा विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ पुस्तके खरेदी करून शिवसाहीत्य प्रसार अभियानास मंगल कामना दिल्यात.यावेळी साप्ताहीक सुवर्णदिप चे रावेर तालुका प्रतिनिधि राजेश वसंत रायमळे यांनी सुद्धा काही ग्रंथ पुस्तके खरेदी केली. तसेच पत्रकार राजेश वसंत रायमळे यांनी सुद्धा पोलि निरीक्षक साहेबांना डा.आ.ह.साळुंखे लिखित सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध या ग्रंथातील विचारांचे नवनाथ जाधव यांनी केलेले संकलन "बुद्ध समजून घतांना" हे पुस्तक भेट दिले.या पुस्तकात बुद्ध विचार संकलित केलेले असून डा.आ.ह.साळुंखे यांच्या सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध या पुस्तकातून सुविचार घेतलेले आहेत. तथागत बुद्धांचे मूळ विचार व डाॅ.आ.ह.साळुंखे यांचे चिंतनात्मक मौलिक भाष्य अशा दोन विभागात हे संकलन आहे.डाॅ. साळुंखेंच्या मते बुध्दांच्या ह्रदयाला प्रत्येकाचे ह्रदय जोडलेले आहे .कुणाचे दृश्य स्वरूपात असेल तर कुणाचे अदृश्य स्वरूपात .म्हणजेच तिमीराकडून तेजाकडे नव्हे तर प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा अनुभव बुद्ध विचार वाचल्यावर येतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चक्र प्रवर्तन अर्थात धर्मांतरानंतर बुध्दांची विचारधारा समजून घणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.बुध्दांचे विचार म्हणजेच जणू रत्नांचा खजिनाच आहे असे प्रस्तुत लेखक जाधव साहेबांचे मत आहे.बुद्ध तत्वज्ञान करुणा,दु:खमुक्ती,प्रज्ञा,वास्तवता,समता,कल्याणमित्रता, स्वयंप्रकाशित व्हा ई.घटकांवर प्रकाश टाकते.बुद्ध ग्रंथ प्रामाण्य अथवा व्यक्ती प्रामाण्यापेक्षा विवेक प्रामाण्यावर भर देतांना आढळून येतात.आणि हा निकष त्यांनी स्वतःलाही लावलेला आहे म्हणजेच बुद्धांचे विचार आपल्या विवेकाला पटत असतील तरच स्वीकारावेत, असे स्वतः बुद्ध सांगतात.बुद्ध स्वातंत्र्याचाही आग्रह धरतात.मानवच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांच्या स्वातंत्र्यासाठी ते आग्रही होते हा अनुभव त्यांनी चीमणीच्या स्वतंत्र्याविषयी केलेल्या ऊद्घोषणेवरून आल्याशिवाय राहात नाही. अशाच अनेक बुद्ध विचारांचे संकलन बुद्ध समजून घेतांना या पुस्तकात आढळते. साहेबांनी सुध्दा पुस्तक भेट मनोभावे स्वीकारत आपल्या मंगल कामना दिल्यात.अशा या मंगल प्रसंगी विलास ताठे तालुकाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ व पोलीस स्टेशनचे राजेंद्र करोडपती,पुरूषोत्तम पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!