रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर येथे आज दि. २८ नोव्हेंबर रविवार रोजी थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिना निमित्त समस्त माळी समाज पंच मंडळ,रावेर तर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांनी अभिवादन केले. [ads id="ads2"]
या प्रसंगी समस्त माळी समाज पंच मंडळ रावेर मुख्य विश्वस्त प्रल्हाद महाजन अध्यक्ष रमेश महाजन, सचिव विनोद पाटील ,पंच मंडळ सदस्य उमेश महाजन, ईश्वर महाजन, सुकलाल महाजन, प्रल्हाद पाटील, समाधान महाजन, प्रकाश रतिराम महाजन, प्रकाश प्रभाकर महाजन, मोतीराम महाजन , हिरामण महाजन यांच्यासह समाज बांधव मोठयासंख्ये उपस्थित होते.

