जळगाव प्रतिनिधी (समाधान गाढे) ओबीसी समाज बांधवांची जात निहाय जनगणना करावी ओबीसी समाज बांधवांना नवीन योजना सुरू कराव्यात ओबीसी विद्यार्थी यांचे शिष्यवृत्ती योजना मद्ये भरीव वाढ करण्यात यावी.[ads id="ads2"]
BVOK अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करण्यात यावी, ओबीसी समाज कारागीर सुवर्णकार यांचे साठी संत नरहरी महाराज कारागीर कल्याण महामंडळ स्थापन करण्यात यावे.[ads id="ads1"]
आदी मागण्यासाठी राष्ट्रीय जनता दल ओबीसी विकास मंचआणि जळगाव जिल्हा सुवर्णकार कारागीर संस्था यांचे वतीने जिल्हाधिकारी जळगाव आणि समाज कल्याण आयुक्त अधिकारी यांना आज निवेदन सादर करण्यात आले व मागण्या संदर्भात चर्चा करून वरिष्ठ अधिकारी यांचे कडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा : - रावेर येथे राष्ट्रीय ओ बी सी मोर्चा, किसान मोर्चा, निळे निशान सामाजिक संघटना यांच्या वतीने जेलभरो आंदोलन
याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते श्री कृष्णा सोनार,श्री हरीष जगताप, श्री ज्ञानेश सोनार, श्री हर्षल सोनार ,श्री प्रदीप सोनार, श्री सुनिल बिरारी तसेच सुवर्णकार कारागीर ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

