रावेर पोलीस स्टेशन मध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 
रावेर  प्रतिनिधि  (राजेश  रायमळे)

      रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.[ads id="ads2"] 

     याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दि.१४ नोव्हेंबर रविवार रोजी रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शनात रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत मार्गदर्शन करतांना ते म्हणालेत की,त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचे अनुषंगाने सावधगीरी बाळगत गावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घेण्यात यावी.[ads id="ads1"] 

   तसेच गावात येणारे नवीन अनोळखी व्यक्ती अथवा फेरीवाले विक्रेते यांचेवर लक्ष ठेवून अशा लोकांची प्राथमिक माहीती संकलीत ठेवावी.तसेच आयत्यावेळेस सुचवलेल्या ईतरही महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन केले.

     यावेळेस रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गांवचे पोलीस पाटील हजर होते.बैठक यशस्वी होणे कामी,रावेर पोलीस स्टेशन च्या कर्मचारी वृंदाने अथक परिश्रम घेतले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!