रावेर तालुका प्रतिनीधी (राजेश रायमळे) दि. १४ नोव्हें. २०२१ आज रावेर दिव्यांग संघटना व भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक रावेर यांना निवेदन देण्यात आले.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बार्शी तालुक्यातील आमदार राजेंद्र राऊत यांनी संपूर्ण महाराष्ट्र भरातील दिव्यांग यांना बस मध्ये जी ७५ टक्के सुट देण्यात येते त्यामुळे एस . टी . महामंडळ तोट्यात आहे असे अकलेचे तारे तोडत जणु दिव्यांग बांधव यांना स्वतः च्या खिशातुन पैसे देऊन बस सेवा देत आहेत असे दाखवत आहे का? [ads id="ads1"]
व आज दिव्यांग बांधव हे आमच्या भिकेवर जगणारा वाटत असेल हा गैरसमज करीत आमदार यांनी एका व्हीडीओ क्लीप मध्ये अपंग हा शब्दाचा पंधरा वेळा उच्चार करीत एक प्रकारे अपमानास्पद बोलले आहे त्यामुळे दिव्यागं बांधवाच्या महाराष्ट्र भर भावना दुखावल्या गेल्या आहेत.त्यांनुसार दिव्यांग हक्क अधि नियम २०१६ दिनांक २८ / १२ / २०१६ चे परिपत्रानुसार महाराष्ट राज्यात सर्व शासकिय वा इतर कागदपत्रे यात अंपग हा शब्द काढून दिव्यांग शब्दाचा वापर करणे किंवा बोलणे बंधनकारक आहे तरी आमदारांनी यांनी सर्व महाराष्टू दिव्यांग बांधवाची माफी मागावी व त्यांच्यावर कलम ९२ नुसार गुन्हा दाखल व्हावा असे निवेदनात म्हटलं आहे निवेदन देतांना दिव्यांग भाजप तालुकाध्यक्ष रजनीकांत बारी व संदीप पाटील ,महेश महाजन ,दिव्यांग संघटना वतीने जिल्हा ध्यक्ष संजय दिनकर बुवा संजय गांधी निराधार समिती सदस्य घनश्याम हरणकर ,बिजलाल पाटील, संजय माळी हे दिव्यांग बंधू उपस्थित होते.