Raver : शहरात भटकंती करणाऱ्या गरीब मुलांना सामाजिक बाधिलकी म्हणुन बाल कल्याण समिती जळगांव येथे केले रवाना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)

रावेर येथे सुमारे ८ ते १० दिवसांपासून आम्हाला रावेर शहरात छोरिया मार्केट तसेच आजूबाजूच्या परिसरात दोन मुले व दोन मुली हे गावांत दिवसभर भिक मांगूत फिरतांना दिसतात. [ads id="ads2"]  

  तसेच रात्री महालक्ष्मी मंदिर परिसरात झोपतात. म्हणून प्रणित महाजन व त्यांचे सहकारी मित्र अशा गावांत भटकणाऱ्या लहान मुलांना भेटून त्यांचे नाव व गाव विचारता त्यांची नावे (१) अनिल रामसिंग पावरा अंदाजे वय ७ वर्षे, (२) राधा रामसिंग पावरा अंदाजे वय ६ वर्षे, (३) भारती रामसिंग पावरा अंदाजे वय ४ वर्षे, (४) विक्रम रामसिंग पावरा अंदाजे वय ३ वर्षे हल्ली राहणार जुना सरकारी दवाखान्याच्या मागे, रावेर असे सांगितले. [ads id="ads1"]  

  सदर ठिकाणी जाऊन त्यांचे आई- वडिलांचा तपास केला असता त्यांचे वडील रामसिंग पावरा व आई हे दारूच्या नशेत होते ते नेहमी दारू सेवन करीत असतांना त्यांची मुले त्यांच्या मारहाणीच्या धाकाने गावात भिक मागत फिरतात व आईवडिलांना घाबरतात. सदरचे मुले ३ दिवसापासून आमच्याकडे राहत आहेत. सदर मुलांनी भिक मांगतांना ते वाम मार्गाने लागू नये त्यांचे भविष्य उज्वल व्हावे. 

 हेही वाचा :  रावेरमध्ये चोरी ; ३० हजार रुपयांची रोकड लांबवली ; रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल 

या मुलांना त्यांचे आई- वडील सांभाळ करायला तयार नसल्याचे दिसून येत असल्याने तसेच ही मुले रात्री- बेरात्री भटकतात तरी या चारही लहान मुलांना बाल कल्याण समिती जळगांव येथे दाखल करण्यात यावे. याबाबत चा अर्ज रावेर पोलीस निरीक्षक मा. कैलास नागरे यांना रावेर शहरातील युवक नेतृत्व प्रणित महाजन व त्यांचे सहकारी दिपक जाधव, प्रफुल महाजन, सचिन पाटील, सागर जगताप, तुषार महाजन, महेश चौधरी, लहू जाधव, गोलू मराठे, विक्रांत मराठे, शुभम मराठे, गोपाल पाटील, योगेश पवार, योगेश महाजन, जयेश महाजन, दुर्गेश मोपारी, राजेश महाजन, श्रीकांत जगताप, गोविंद मराठे, कपिल बिरपन, आदर्श मंगवानी यांनी आपले जवाब व स्वाक्षऱ्यासह दिला.

यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया करून सदरच्या बालकांना बाल कल्याण समिती जळगांव येथे आजच रवाना करण्यात आले आहे. याप्रसंगी या लहान मुलांना नविन ड्रेस व केक कापून निरोप देत असतांना सर्वांना अश्रू अनावर झालेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!