इसिस काश्मीर' कडून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला 'इसिस काश्मीर' या संघटनेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला 'इसिस काश्मीर' या संघटनेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे.[ads id="ads2"]  

गंभीरला जीवे मारण्याची धमकी आल्याबद्दल मध्य दिल्लीच्या डीसीपी श्वेता चौहान यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, खासदार गौतम गंभीर यांना इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार केली आहे. यानंतर गंभीर यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.[ads id="ads1"]  

गौतम गंभीरने दिल्ली पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, त्याला आयएसआयएस काश्मीरकडून धमकी आली आहे. ई-मेलवरून ही धमकी पाठवण्यात आली असल्याचंही गंभीरने सांगितलं आहे. दहशतवादी संघटनेनं गंभीरला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अधिकृत ई मेल आयडीवर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास धमकीचा मेल आला असल्याचं गंभीरने या पत्रामध्ये म्हटलं आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!