महाराष्ट्रातील एस.टी.च राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व एस. टी.कर्मचारी यांनी संप पुकारलेला आहे आतापर्यंत अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.वास्तविक पाहता एस. टी.च राज्य सरकार मध्ये विलीनीकरण ही रास्त स्वरूपाची मागणी आहे.[ads id="ads2"]
या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हा युवा प्रमुख श्री.अविनाशभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात व रावेर तालुका युवा प्रमुख श्री.योगेशभाऊ निकम यांच्या उपस्थितीत आज रावेर येथील एस. टी.कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.या प्रसंगी प्रहारचे राजुभाऊ पाटील,शेख लतिफ भाई,मच्छिंद्र कोळी, तय्युब तडवी,मनोज वरणकर,पंकज निकम व कार्यकर्ते उपस्थित होते.

