मुक्ताईनगर प्रतिनिधी : नवनिर्वाचित मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष राजूभाऊ सांगावकर, तालुका उपाध्यक्ष श्रीराम पाटील (कुऱ्हा पानाचे) तालुका उपाध्यक्ष सुधाकर देशमुख (अंतुर्ली) तालुका सचिव मनोजकुमार पाटील, तालुका कार्याध्यक्ष काशिनाथभाऊ झाल्टे यांचे नियुक्ती पत्र प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. [ads id="ads2"]
प्रहार जनशक्ती पार्टी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांच्या प्रयत्नाने मुक्ताईनगर मतदारसंघातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष ना.बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला आणि पक्ष बळकट करण्यासाठी कटिबध्द राहू शब्द दिला..[ads id="ads1"]
या वेळी जिल्हाउपाध्यक्ष विलासभाऊ पांडे, मुक्ताईनगर युवक तालुकाध्यक्ष अनिल कान्हे, जिल्हाउपाध्यक्ष संजय आवटे व सर्व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.