नाशिक वार्ताहर (सुशिल कुवर) नाशिकमधील द्वारका परिसरातील रवींद्र विद्यालय येथे टीईटी परीक्षेस वेळेत न आलेल्या मुलांना परीक्षा केंद्रात न घेतल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस बंद आहेत. त्याचा फटकाविद्यार्थीना फटका बसला. बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थांना बसला आहे.
[ads id="ads2"]
अनेकांना खासगी वाहतुकीने यावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थी परिक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला. उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना गेटच्या आत घेण्यात आले नाही. परीक्षार्थी कोमल खरत संगमनेरहून येथून दुचाकीवर आली.
[ads id="ads1"]
तिला पाच मिनिटे उशीर झाल्यामुळे परीक्षा केंद्रात घेतले नाही. शासनाने यापुर्वी तीन वेळा परीक्षा रद्द केली, बसेसही बंद आहे, त्यामुळे उशीर झाल्याचे रडत कोमल हिने माध्यमांना सांगितले.