रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील तत्कालीन ग्रामसेवक शिवाजी सोनवणे यांनी प स प्रशासनाशी संगनमत करून दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांमध्ये प्रशासकीय व आर्थिक अनियमितता केली असल्याने संतोष कोसोदे यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे चौकशीची मागणी केली होती,सदर तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत.[ads id="ads2"]
मागील आठवड्यात श्री सोनवणे यांनी सन २०१५-२०२१ या आर्थिक वर्षीत १४ वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामावर एकही मजूर न लावल्याची बाब उघड झाली होती.[ads id="ads1"]
सदर प्रकरणी या ग्रामसेवकाची चौकशी सुरू आहे तसेच श्री सोनवणे यांनी ग्रामसेवक संघटनेच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा गैरवापर करून हृदय शस्रक्रिया झाल्याचे भासवून तब्बल १२ वर्ष वाघोदा खुर्द ग्रामपंचायत येथून बदली टाळल्याची बाबही उघड झाली आहे.
हेही वाचा : - Jalgaon : जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत 37 (3) कलम जारी |
प्रशासन या सर्व तक्रारी बाबत काय कारवाई करते ? की श्री सोनवणे यांना पाठीशी घालते ? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.