रावेर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

अनामित
रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) दि.११ नोव्हेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता रावेर पोलीस स्टेशन येथे त्रिपुरा राज्यात विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंच यांचे द्वारे मुसलमानाच्या मदरसा आणि घरावर करण्यात येत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रजा अकॅडमिने उद्या दि.१२ नोव्हेंबर शुक्रवार रोजी घोषित केलेल्या भारत बंदच्या अनुषंगाने 
[ads id="ads2"]
रावेर व रसलपूर मुस्लिम पंच कमिटी, रावेर शहरातील मसीद चे मौलाना,मुस्लिम समाजातील नगरसेवक, तसेच शांतता कमिटी सदस्य यांची रावेर येथील मा पोलीस निरीक्षक कैलास नागरे रावेर यांचे अध्यक्षतेखाली मिटिंग घेण्यात आली.
 [ads id="ads1"]     
सदर मीटिंगला रावेर शहराचे नगरअध्यक्ष दारा मो. जफर मो. नजर मौलाना, शिवसेना जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन , काँग्रेस ता. अध्यक्ष, ज्ञानेश्वर महाजन, मुस्लिम पंच कमिटी सदस्य, गयास शेख , रसलपूर पंच कमिटी, अयुब पहेलवान, दिलीप, कांबळे, बाळू शिरतुरे, आसिफ मेंबर, अयुब मेंबर, सादिक मेंबर, हरीश गणवानी, नितीन पाटील भाजपा प्रसिद्धी प्रमुख संतोष पाटील काँग्रेस शहर प्रमुख, शेख महेमूद शेख हसन राष्ट्रवादी शहर प्रमुख, रफिक आलेगार, युसूफ आलेगार, आरिफ आलेगार, अशोक शिंदे व पोलीस पाटील असे हजर होते.सदर मिटिंग मद्ये सदर बंद हा शांततेत पार पाळण्यात यावा. कोणालाही बंद पाळण्याबाबत जबरदस्ती करण्यात येवू नये योग्य ते मार्गदर्शन करण्यात येवून सूचना देण्यात आल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!