रावेर वार्ताहर- मुस्लिमांच्या धार्मिक भावना भडकाऊन देशात ऊद्रेक केला जात आहे, जेव्हा जेव्हा देशात निवडणुका लागतात, ओबिसींची जातीआधारीत जनगणनेचा मुद्दा येतो,
[ads id="ads2"]
तेव्हा तेव्हा हिंदु-मुस्लिम असा वाद निर्माण केला जातो व ओबिसींचा जनगणनेवरुन लक्ष भटकवुन दंगलीकडे वळविले जाते, जेव्हा ओबिसींची जातीआधारीत जनगणनेचा मुद्दा येतो
[ads id="ads1"]
तेव्हा बाबरी मज्जिद पाडली जाते,आॅपरेशन ब्लु स्टार केला जातो,शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात मुद्दाम सैनिक घुसवून शिखांच्या धार्मिक भावना भडकाऊन दंगली केल्या जातात,आजही भारत देशात बामसेफ भारत मुक्ती मोर्चा तर्फे संपुर्ण भारत देशात ओबिसींची जातीआधारीत जनगणनेचा मुद्दा घेऊन जागृती केली जात आहे,आणी ओबिसी ची जागृती झाली नको पाहिजे, म्हणुन त्रिपुरा राज्यात मुस्लिम बांधवांवर अन्याय अत्याचाराचे सत्र विश्व हिंदू परिषद आर एस एस द्वारे केले जात आहे,म्हणुन भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मा.नितिन गाढे यांनी या आंदोलनात सहभागी होऊन राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ला समर्थन देऊन विश्व हिंदू परिषदेचा निषेध केला व ईशारा केला जेव्हा आम्हाला अवसर मिळेल तेव्हा भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही या ब्राम्हणवाद्यांचा,या आर एस एस च्या गुंडांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा चोख इशारा दिला,प्रसंगी जमाअते ईस्लामि हिंद रावेर युनिट चे शेख शफिउद्दीन सर, मुस्लिम पंचायत कमिटि चे शेख गयास शेख रशीद सर, नगरसेवक सादिक शेख सर, नगरसेवक आसिफ मोहम्मद सर,अ.रफीक अ.अजिज सर,शेख अजमोद्दीन शेख करीम सर,शेख जुबेर शेख जहीर सर,फहिम सर, नगरसेवक शकिल शेख असलम,हनिफ शेख आणि इतर सर्व मजलुम साथिदार उपस्थित होते.
