रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) आज दि.१२/१०/२०२१ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यालयात रावेर तालुक्यातील असंख्य तरुण तरुणाचा प्रवेश झाला. फुले - शाहू - आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन निळे निशाण सामाजिक संघटनेच्या ध्येय - धोरण तसेच कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून आज रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेमध्ये असंख्य लोकांनी प्रवेश केला. [ads id="ads2"]
यावेळी जळगाव जिल्हा नियोजन समितीचे उपाध्यक्ष सदाशिव निकम यांच्या उपस्थितीत व तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे तसेच युवक तालुका अध्यक्ष विजय धनगर यांचे नेतृत्व स्विकारून निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश केला .त्या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष सुधिर सेंगमिरे , नारायण सवर्णे , धिरज तायडे व असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

