जळगाव जिल्ह्यात डंपर्स आणि ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून अवैध वाळु वाहतूक सुरूच तर वाहनांनी वेग मर्यादाच ओलांडली ; वाळु वाहतूक ट्रॅक्टरची रिक्षाला धडक

अनामित
जळगाव - जिल्ह्यात सद्या वाळु तस्करांची संख्या दिवसागणिक वाढु लागली आहे, इतकेच नव्हे तर अपघातात ही तितकीच वाढ झाली आहे तर यात वाळू तस्करी करणारे वाहन डंपर असो की ट्रॅक्टर यांच्या वेगेचे जिल्ह्यात काहीच बंधने नसल्याचे दिसून येते तर एकी कडे वाळु वाहतूक करणारी साधने धडाधड लोकांना उडवतात तर दुसरीकडे [ads id="ads2"] 
वाहन वेग मर्यादाच ओलांडली यांना जिल्ह्यात कुठलेही नियम नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे जळगाव जिल्ह्यात कागदोपत्री वाळूचा व्यवसाय बंद अहे मात्र तापी ,गिरणा पात्रातून याचा अंधाधुंद वाळु उपसा सुरूच आहे, वाळू तस्कर हे कुणालाच जुमानत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसुन येत आहे. [ads id="ads1"]
 यातच शिव कॉलनी स्टॉपजवळ वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव वेगाने वेगमर्यादा ओलांडून धावत असणार्‍या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिली वाळूची वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने MH 19 V 32441 ह्या क्रमांकाच्या रिक्षेला धडक तर दिली मात्र हि धडक इतकी भयंकर होती की, ट्रॅक्टरच्या धुडाची पुढील दोन्ही चाके ही रिक्षात रूतून बसली , या रिक्षेचा चालक हा रिक्षातून उतरून समोर उभा असल्याने त्याला यात इजा झाली नाही. मात्र भर चौकात घडलेल्या या अपघाताने प्रचंड खळबळ उडाली. संंबंधीत ट्रॅक्टर चालकाने घटना स्थळावरून पलायन केले तर पलायन करणे हे यकाही नवीन गोष्ट जिल्ह्यात राहिली नाही अधी अपघात करायचा मग जागेवरुन पळुन जायचे मात्र यावर कधी कारवाई होईल या कडे जळगाव करांचे लक्ष लागून आहे तर वाळूचा उपसा कागदोपत्री बंद असला तरी अनेक डंपर्स आणि ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून याची अवैध वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत असून यातूनच हा अपघात घडल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!