रावेर तालुक्यातील तामसवाडी परिसरात सततच्या हवामान बदलामुळे बळीराजा हतबल

अनामित
रावेर प्रतिनिधी || राजेश रायमळे तामसवाडी ता.रावेर परिसरात मागील पाच दिवसांपासून   वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणमुळे काहि ठिकाणी रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तुरी व केळी बागांसह नुकतीच पेरणी झालेल्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच ईतर पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
[ads id="ads2"] शेतकरी वर्गाकडून पिकांना रोगप्रतिबंधक उपाय म्हणून पिकांना विविध प्रकारच्या फवारणीसाठी खर्चात वाढ झालेली दिसून येत आहे.
ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात:- खरिप हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे व वातावरण बदलामुळे उत्पादनात चालू वर्षी मोठया प्रमाणात घट झाल्यामुळे बळीराजा हतबल असतानां पुन्हा एकदा शेतकरी वर्गासमोर नवीन संकट उभे राहिले आहे. 
[ads id="ads1"] या वातावरणामुळे सर्वच पिके धोक्यात आली असून पिकांना विविध रोगांचा सामना करावा लागत आहे. पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रासह या परिसरात रिमझिम पडणाऱ्या पाऊसाच्या सरीमुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.फ्लोरा अवस्थेत असणाऱ्या तुरी पिकांवर सुद्धा कुजेचे व गळीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसत आहे. हाततोंडाशी आलेला पीक बाजारात व्यवस्थित जाणार का, याचीच चिंता आता सतावत आहे.तामसवाडी ता.रावेर परिसरात रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून गहू व हरभरा यांची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहे. मात्र ढगाळ वातावरण व अचनाक पडणाऱ्या पावसामुळे पेरणी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वातावरणामुळे पेरणी करून झालेल्या गहू, हरभरा पिकांवर मावा, करपा, तांबेरा व आळीचा प्रादुभाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पेरणीला शेतकरी वर्गाकडून ब्रेक देण्यात आल्यांचे चित्र दिसत आहे. चालू वर्षी बळीराजा निसर्गापुढे पूर्णपणे हतबल झाल्यांचे दिसत आहे, वारवांर वातावरणात बदल होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढून उत्पादनात घट होत आहे. कायमच पिकांना वाचविण्यासाठी भाडवंल कसे उभे कारायाचे असा प्रश्न सध्या उभा राहिला आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!