जळगांव वार्ताहर (सुरेश पाटील) संस्थापक अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक मा.अण्णा हजारे प्रणित.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या जळगांव जिल्हा संघटनेची पुर्नरबांधणी करून जिल्हा,तालुका व शहर कार्यकारणीची नविन बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांची निवड करून मान्यतेसाठी केंद्रीय कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.
[ads id="ads2"] तरी जळगाव जिल्ह्य़ातील कार्यकत्याची (आदरणीय अण्णा हजारे समर्थक आणि सदस्य) तसेच आंदोलनात, समाजसेवेसाठी नव्याने सहभागी होवू इच्छिणाऱ्या कार्यकत्याची सभा आयोजित केली आहे. मा अशोकजी सब्बन साहेब निरीक्षक तथा सरचिटणीस भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी ठीक 1 वाजता जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे
[ads id="ads1"] तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रामाणिक, चारित्रसंपन्न, त्यागी, निस्पॄह, सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या व समाज कार्यासाठी वेळ देवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे. टिप- स्थळ, मिटींगचे ठिकाण या साठी फक्त मोबा. नं. 9822485311 वर संपर्क साधावा ही विनंती. जिल्हा,शहर व तालुक्यातील कार्यकारणीवर काम करण्यास ईच्छुक असणार्या सर्वानी उपस्थित राहणे बंधन कारक आहे तरी कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक सुरेश पाटील यांनी केले आहे.