मेरठ (यूपी) उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील मवाना भागात 'मोबिल ऑइल'च्या दुकानात भीषण आग लागली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तेलाच्या डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आग आणि स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी आग आटोक्यात आणली.
[ads id="ads2"] एसडीएम गुप्ता यांनी सांगितले की, अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात दुकान मालकाचा मुलगा आणि दोन मजुरांचा समावेश आहे. याशिवाय दोन जण जखमी झाले आहेत. आगीचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे त्यांनी सांगितले.
[ads id="ads1"] अपघाताची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी के. बालाजी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांच्याशिवाय राज्याचे पूरनियंत्रण मंत्री दिनेश खाटिक हेही घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मवाना येथील महामार्गावरील सुभाष चौकाजवळील श्रवण कुमार यांच्या मोबिल ऑईलच्या दुकानाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. शेजारी असलेल्या एका सायकल दुकानालाही आग लागली.