रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) Raver तालुक्यातील शिंदखेडा येथे अज्ञात चोरट्यानी घरफोडी करून ३८ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.यामुळे रावेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, Raver तालुक्यातील शिंदखेडा येथील पंकज पंडीत महाजन यांच्या घराचा कुलुप कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.
हे पण वाचा :- खिर्डी येथील अवैध दारू विक्री बंद बाबत महिलांचा एल्गार..! निंभोरा पो.स्टे.उपनिरीक्षक यांना निवेदनद्वारे मागणी..
कपाटातील पत्री पेटीमधून वीस हजार रुपये रोख १६ हजार रुपये किमतीची ४ ग्रॅम सोन्याची अंगठी दोन हजार रुपये किमतीच्या वेग-वेगळ्या देवतेच्या मुर्त्या असा एकूण ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे. याबाबत पंकज महाजन यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरुध्द चोरीचा गुन्हा Raver पोलिसात नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास Raver पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुरेश मेढे तपास करीत आहेत.