सविस्तर वृत्त असे की खिर्डी परिसरात अवैद्य रित्या देशी व हातभट्टी (पन्नी )दारुची मोटर सायकल वर बिनधास्त पणे बसून मोठ्या प्रमाणात खिर्डीच्या बस स्टैंड जवळ तस्करी होत आहे.[ads id="ads1"]
जवळच्या 3 किमी. अंतरावर असलेल्या गावी बलवाडी मध्ये नदीच्या काठावर बसून दीन दहाडे अवैध दारू विक्री होत असुन याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे.परंतु हा परिसर जवळच असलेल्या निंभोरा पोलीस स्टेशन च्या हद्दीत राजरोस पणे होताना दिसत असल्याने त्यात काही आर्थिक कारण साटे लोटे तर नाही ना? असे नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा आहे.
हे पण वाचा :- Raver : तालुक्यातील शिंदखेडा येथे घरफोडी ; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल
या हातभट्टी दारू मुळे परिसरातील अनेक गावातील तरुण पीढी सुध्दा दारुच्या आहारी गेली आहे.तसेच तळीराम दिवसभर देशी व हातभट्टीची (पन्नी ) दारू पिऊन गावभर फिरतात.यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना तळीरामांपासुन त्रास होत असून दारुमुळे कित्येकांचे संसार देशोधडीला लागले आहे. मात्र याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होतांना दिसत आहे.तरी आपण त्वरित लक्ष देऊन पूर्णपणे परिसरातील हातभट्टी (पन्नी ) ची दारू बंदी करावी व त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री करणाऱ्यावर सुद्दा कार्यवाही करण्याची मागणी खिर्डी खु.येथील महिलांनी पो. निरीक्षक यांना निवेदन प्रसंगी केली.
तसेच पो.उपनिरीक्षक यांनी अवैध दारू विक्रेत्यावर व गावठी दारू भट्यावर लवकरचं कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन महिलांना दिले.यावेळी उपस्थित खिर्डी बिट अंमलदार राजेंद्र पाटील, पोहेको. विकास कोल्हे, पो.पाटील प्रदीप पाटील,ग्रा.प.सदस्य पवन चौधरी, मुकेश कोचूरे, राजेंद्र कोचूरे, प्रदीप महाराज, कांतीलाल गाढे, विनायक जहुरे, भिमराव कोचूरे, संकेत पाटील, सादिक पिंजारी,महिला प्रतिनिधी उषाबाई पाटील, साधनाबाई कोचूरे, दगुबाई शिरनामे, नदाबाई गुरव, शालिनी भालेराव, वैशाली कोळंबे, सुलोचनाबाई भंगाळे आदि उपस्थित होते.