विवरे प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे खु येथील आशा पारीक नावाने प्रसिद्ध असलेल्या एका पुलाजवळुन एक किमी अंतरावर असलेला निंभोरा फाटा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आज 20/11/2021 रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.[ads id="ads2"]
त्यात गाडी नंबर MH19AH7589 व MH04BT8524 असे एक्सीडेंट झालेल्या गाडीचे नंबर असुन गाडी चालक यांची ओळख पटली नाही सुत्रानुसार अशी माहिती मिळाली की या दोघ गाडी चालक यांना फैजपुर येथील एक्सीडेंट हॉस्पिटल डॉ खाचणे यांच्या दवाखान्यात भरती करण्यात आलेले आहे . पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशन येथील प्रभावी पोलीस हवालदार विकास कोल्हे व योगेश चौधरी ज्ञानेश्वर चौधरी व त्यांच्या सोबत असलेले सहकार्य होमगार्ड हे करीत आहेत.
हे पण वाचा :- Raver : तालुक्यातील शिंदखेडा येथे घरफोडी ; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल
विवरा ते निंभोरा फाटा दरम्यान रोड वर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी हे खड्डे कधी बुजवणार की आणि कित्येक लोकांचे बळी गेल्यावर खड्डे बुजवणार असे संतप्त प्रश्न लोक विचारात आहे.