संपूर्ण राज्यातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव....
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक हक्क परिषद तथा मायनॉरिटी राईट फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी समाजसेवक रागिब अहमद शेख यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे राज्यातून सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.रागिब अहमद शेख यांना सुरुवातीपासूनच सर्व जाती धर्मात समाज सेवा करण्याची आवड होती आणि आहे.
[ads id="ads2"] त्यांचे सामाजिक महत्त्वाचे कार्य लक्षात घेता बाहेरील देशात त्यांना गेल्या दोन-तीन वर्षापूर्वी आपल्या भारतातील सर्व जाती धर्मातील नागरिकांतर्फे यशस्वीरित्या प्रतिनिधीत्व मिळाले होते,
[ads id="ads1"]
अशाप्रकारे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश मायनॉरिटी राईट फेडरेशन अर्थात अल्पसंख्यांक हक्क परिषद कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती अल्पसंख्यांक हक्क परिषदेचे अध्यक्ष एडवोकेट जुबेर शेख यांनी केली आहे.त्याच्या या नियुक्तीबद्दल संपूर्ण राज्यातून सर्वस्तरातून रागिब शेख यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.