रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) आज दि,11/11/2021 रोजी निळे निशाण सामाजिक संघटना मुख्य कार्यालयात वरिष्टांच्या आदेशानुसार गेल्या अनेक वर्षांपासून फुले शाहू आंबेडकरी विचारधारे विषय प्रामाणिक आणि एकनिष्ठ असलेले विजय धनगर यांची रावेर तालुका युवक अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.[ads id="ads2"]
नियुक्ती पत्र जळगांव जिल्हा नियोजन समिती उपाध्यक्ष सदाशिव जी निकम यांचे हस्ते देण्यात आले. त्या प्रसंगी रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे,उपाध्यक्ष सुधीर सैगमीरे ,नारायण सवरने, शरदभाऊ बगाडे ,तालुका सचिव बाळू तायडे ,युवक उपाध्यक्ष धीरज तायडे कार्यालयीन सचिव बाळू भाऊ निकम यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय धनगर यांच्या निवडीने त्यांच्यावर संपूर्ण परिसरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.