स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांच्या आक्रमकतेने महावितरण नरमले ; कृषी पंपाचे तोडलेले कनेक्शन महावितरण जोडुन देणार..

अनामित
जळगाव - तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे तोडलेले कनेक्शन तत्काळ जोडुन द्या. व सक्तीच्या विज बिल वसुली थांबवा या मागणीसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांनसह जळगाव महावितरण कार्यालयावर २९ नोव्हेंबर रोजी धडक दिली. महावितरणने शेतकऱ्यांनकडुन सक्तिने विज बिलाची वसुली चालु करुन शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्यात  आले होते 
 [ads id="ads2"]
जळगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे कनेक्शन तोडल्याने शेतातील रब्बी पिके. हरबरा, गहु,कांदा, इतर भाजी पाले सारखे पिके वाळण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे प्रशांत डिक्कर यांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणला चांगलेच धारेवर धरले. मुख्य अभियंता डोये अकोला व अधिक्षक अभियंता एस एम आकडे बुलडाणा यांच्या सोबत प्रशांत डिक्कर यांनी फोनवर बोलुन शेतकऱ्यांची सर्व आपबिती कथन केली. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असल्यामुळे आतातरी विज बिल भरु शकत नाहीत.
[ads id="ads1"]
 त्यामुळे महावितरणने सामंजस्याची भुमिका घेत सक्तिने बिल वसुल न करता तोडलेले कनेक्शन ३० नोव्हेंबर रोजी जोडून देणार असल्याचे उप कार्यकारी अभियंता एम. ए. कातखेडे यांनी प्रशांत डिक्कर यांना लेखी पत्र देऊन उद्या ३० नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचे तोडलेले कनेक्शन जोडणार असल्याचे सांगितले.त्यामुळे विज धारक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यावेळीही सय्यद बाहोऊद्दीन, मोहन गावंडे, विलास इंगळे, वैभव वानखडे, प्रतिक गावंडे, विजय ठाकरे, विशाल सावंत, पवन सुके, तुकाराम पाटील, शिवदास वाघ, सुरेश तोठे, प्रदीप खिरोडकार, अनंता सातव, सुपडा सोनोने, गजानन रावणकार, मंगेश भटकर,सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!