मुंबई प्रतिनिधी (सुशिल कुवर) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे सहसंचालक डॉ. लोकेश गभणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या ॲपवर मंगळवार दि. ३० नोव्हेंबर, बुधवार दि. १ डिसेंबर आणि गुरुवार दि. २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक दिपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
[ads id="ads2"]
1 डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. राज्यात एड्स या आजारावर नियंत्रण व जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था कार्यरत आहे. राज्यात एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली, या कार्यक्रमाची ध्येयधोरणे, या कार्यक्रमाकरिता आर्थिक मदत, एचआयव्ही तपासणीसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या सुविधा, एचआयव्ही व एड्स यातील फरक आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. गभणे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
