पोलीस बॉईज असोसिएशन च्या अकोला शहराध्यक्ष (पूर्व) पदी अमित सरदार यांची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

अकोला प्रतिनिधी :  पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्यालय च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अमित सरदार यांची नियुक्ती पोलीस बॉईज असोसिएशन च्या अकोला शहराध्यक्ष (पूर्व) या पदावर नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती पोलीस बॉईज असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.[ads id="ads2"] 

  हा कार्यक्रम अकोला जिल्हा कार्यालयात पार पडला यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे , विजय नावकार (जिल्हाध्यक्ष) नरेश राऊत जिल्हा उपाध्यक्ष, ज्ञानेश्‍वर चौधरी ,प्रफुल करवते  शुभम मनवर ,सूरज इंगळे विवेक चव्हाण , अमोल सरदार ,सुनील यादव , अमोल पोफले आदी कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते .